येडगाव पाटबंधारे वसाहतीमधील रहिवासींचा वार्षिक स्नेहमेळावा संपन्न

पिंपळवंडी – ( दि १४) येडगाव ( ता जुन्नर) येथील पाटबंधारे वसाहतीमध्ये राहणा-या आजी व माजी रहिवासी यांचा वार्षिक स्नेहमेळावा मोठ्या थाटात आणि मोठ्या उत्साहाने संपन्न झाला
येथील येडगाव धरणालगत पाटबंधारे वसाहत असून या ठिकाणी नोकरीनिमित्ताने राज्याच्या विविध भागामधुन सन १९७२ पासून वास्तव्य करणा-या आजी व माजी रहिवासी यांचा वार्षिक स्नेहमेळावा अतिशय आनंदामध्ये संपन्न झाला. सदर स्नेह मेळाव्यात निधन झालेल्या सहका-यांना श्रध्दांजली अर्पण करुन पुढील कार्यक्रम सुरु करण्यात आले त्यानंतर प्रत्येक कुटुंबाचा परिचय करुन घेण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या
प्रत्येकाला स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर गप्पागोष्टी व करमणुकीच्या कार्यक्रमाने रंगत वाढत गेली. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले, आरोग्य तपासणी, वृक्षारोपन याचे महत्व विषद केले. नाष्टा चहापाण जेवण असा भरगच्च कार्यक्रम करण्यात आला. उपस्थित अनेक कुटूंबातील मुले, मुली डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी तसेच व्यवसायीक म्हणून समाजामध्ये सेवा बजावत आहेत. हा स्नेह मिळावा संपन्न करण्यासाठी डॉक्टर विजय पालवे, रज्जाक शेख, अरविंद सोनवणे, किरण औटी, संतोष शिंदे, बेराज रजपूत, बाळासाहेब मिंडे, रामदास मोरे, दिलीप मुळे यांनी पुढाकार घेतला.



