विश्वकर्मा पतसंस्थेच्या सभासदांची दिपावली होणार गोड

आळेफाटा:(दि २६) प्रतिनिधी
आळे, आळेफाटा (ता जुन्नर) येथील विश्वकर्मा सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांची दीपावली गोड व्हावी या उद्देशाने भेटवस्तू वाटपास सुरुवात करण्यात आली आहे.
आळेफाटा परिसरातील एक अग्रेसर पतसंस्था अशी ओळख असलेल्या या पतसंस्थेचे जुन्नर तालुका कार्यक्षेत्र आहे. संस्थेने यावर्षी सभासदांना 10 टक्के लाभांश व दीपावली भेटवस्तू वाटप करण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला होता. संस्थेचे एकूण 934 सभासद आहेत.
या पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष हरिदास ताजवे उपाध्यक्ष मंगल दिवेकर सचिव सुनील जाधव, संचालक बंडोपंत ताजवे, देविदास ताजवे, रोहित जाधव, बाळासाहेब गाडेकर, विलास जाधव, नितीन भद्रिगे, जयहिंद भूतांबरे, संतोष जाधव, शामराव जाधव, शारदा भालेराव, व्यवस्थापक विलास डावखर, विठ्ठल जाधव, प्रभाकर दिवेकर लेखनिक रवींद्र वाव्हळ यांचे उपस्थितीत या भेटवस्तू वाटपास सुरुवात करण्यात आली.



