मांगल्याचा परिस स्पर्श बाबुरावजी घोलप – महेंद्र बोऱ्हाडे

.बोरी शिरोली -( दि१४) प्रतिनिधी
दारिद्र्याचे चटके खाणाऱ्या, उपेक्षित,वंचित,कष्टकरी, शेतकरी तसेच निरक्षरांना ज्ञान साक्षर करून त्यांच्या जीवनात सुख समृद्धी व आनंदाची व प्रगतीची पहाट उगवावी म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची ७ सप्टेंबर १९४१ रोजी स्थापना करणाऱ्या, कै. बाबुराव रामजी घोलप साहेबांना अभिवादन करण्यासाठी, व संस्थेचा ८४ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बोरी सुलतानपूर येथे गावच्या सरपंच प्रियाताई खिलारी, उपसरपंच दत्तात्रय डावखर, बाजीराव मुळे, बाबाजी सहाणे , शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सुभाष खिलारी, माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजू पोळ, अजित खिलारी, सुखदेव आतकरी, शिवाजी खिलारी, मुलाणी गुरुजी, गेनभाऊ डावखर,ज्ञानेश्वर खिलारी, मुख्याध्यापक श्री महेंद्र बोऱ्हाडे, योगेश शेळके, उषा भारती,अमन मनियार, सारंग थोरवे, असंख्य शिक्षण प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिमा पूजन झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील जेष्ठ व्याख्याते, निवेदक, राज्याचे इंग्रजी भाषा तज्ज्ञ मार्गदर्शक, सेवक कल्याण निधीचे विद्यमान संचालक व विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे यांनी घोलप साहेबांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. जगण्याची व निर्णय घेण्याची क्षमता म्हणजेच शिक्षण. हीच शिक्षणाची दूरदृष्टी असलेल्या घोलप साहेबांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ग्रामीण व शहरी भागात ज्ञानाचा शुभारंभ सुरू केला. ”पाटी दप्तर हातात घ्या व ज्ञानाचे कुंकू कपाळी लावा” असं म्हणत अज्ञान,अंधकार,निरक्षरता कायमचा पुसून टाकून सर्व समाज ज्ञान साक्षर केला. आपल्याजवळ जे-जे आहे ते इतरांना द्यावे. हे वृक्षाचे व्रत संपूर्ण आयुष्यभर जोपासणारे ज्ञान तपस्वी व दूरदृष्टीचा शिक्षण महर्षी घोलप साहेब ठरले. “चंदनाचे हात पायही चंदन,परिसा नाही दीन कोणी अंग.” असे सर्व आयुष्य घोलप साहेब जगले.गोरगरिबांच्या घरात ज्ञानाचा नंदादीप प्रज्वलित करणारा थोर शिक्षण महर्षी म्हणजेच घोलप साहेब.आज याच संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे. १ लाख विद्यार्थी व ४५०० शिक्षक वर्ग या संस्थेत कार्यरत आहेत. KG ते PG पर्यंतचे शिक्षण तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, इंग्रजी माध्यम,औषध निर्माण शास्त्र, व्यावसायिक शिक्षण व इतरही अनेक ज्ञानदान करणाऱ्या शैक्षणिक शाखा अशा विविध माध्यमांतून संस्था विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. त्यामुळेच संस्था ISO नामांकन प्राप्त ठरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अजित दादा पवार साहेब, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे साहेब, मानद सचिव संदीप कदम साहेब, उपसचिव एल एम पवार साहेब, सहसचिव जाधव साहेब, खजिनदार देशमुख साहेब, संस्था रजिस्ट्रार अभंग साहेब, प्रमोद जाधव साहेब, परीक्षा व मूल्यमापन अधिकारी देशपांडे साहेब,व संस्थेतील सर्व अनुभवी कर्तव्यदक्ष व तज्ज्ञ अधिकारी व पदाधिकारी कार्यरत आहेत.घोलप साहेबांचे शेवटचे शब्द होते, माझ्या पाठीमागे आपली संस्था मुलाप्रमाणे सांभाळा.आज सर्व अधिकारी व पदाधिकारी त्याच तळमळीने, प्रामाणिकपणे, अत्यंत निष्ठेने, नाविन्याचा ध्यास घेऊन दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन संस्थेचा नावलौकिक वाढवत आहेत.श्री बोऱ्हाडे यांच्या व्याख्यानाने विद्यार्थी व ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शेळके यांनी केले.



