राजुरी -( दि १०) प्रतिनिधी
शासन निर्देशाप्रमाणे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी राजुरी ता. जुन्नर येथे समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट व ग्रामपंचायत राजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी अभियान घेण्यात आले.ग्रामपंचायत स्तरावर सदर अभियानाचे नियोजन केले होते.गावातील विविध वाड्यावस्त्यांवर एकुण २० ठिकाणी समर्थ कॉलेज ऑफ इंजिनीरिंग व समर्थ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील ६० स्वयंसेवक विद्यार्थ्यांमार्फत सदर अभियानात सुमारे १३९४ लाभार्थ्यांचा सहभाग नोंदवून त्यांचे आरोग्य कार्ड काढण्यात आले.
सदर अभियानाची सुरूवात जुन्नर तालुक्याचे नव्याने नियुक्त झालेले गटविकास अधिकारी गरीबे साहेब यांच्या शुभहस्ते झाली.याप्रसंगी राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे,उपसरपंच माउलीशेठ शेळके,सदस्य रंगनाथ पाटील औटी,सखाराम गाडेकर,गौरव घंगाळे,शाकिरभाई चौगुले,माजी उपसरपंच मोहन हाडवळे,संदिप औटी,अनिल रायकर,निलेश हाडवळे,राजेश कणसे,सचिन गटकळ,अमोल हाडवळे,स्वप्नील हाडवळे,साईनाथ हाडवळे,मच्छिंद्र हाडवळे,गणेशजी हाडवळे,तलाठी धनाजीराव भोसले,ग्रामविकास अधिकारी एस आर बाळसराफ,समर्थ शैक्षणिक संकुलाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भूषण दिघे, प्रा. सचिन भालेकर,प्रा.नागरे एन.बी.,ग्रामपंचायत कर्मचारी,आशा सुपरवायझर रुपाली नायकोडी,सर्व आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविका,प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी,समर्थ इंजिनिअरींग कॉलेज व फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी व राजुरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य विभागामार्फत प्रथम हे कार्ड नोंदवण्याचे प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना वैभव हाडवळे व आशा सुपरवायझर रुपाली
नायकोडी यांनी दिले.सदर कार्ड काढण्याचा उद्देश व त्याचा फायदा ग्रामस्थांना कश्या स्वरुपात होणार आहे याबाबत सविस्तर माहीती गरिबे यांनी उपस्थितांना दिली.या मोहीमेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले आरोग्य कार्ड नोंदवावे असे आवाहन गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे यांनी सर्व ग्रामस्थांना केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्धल राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भूषण दिघे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी बाळसराफ यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे उपसरपंच माउलीशेठ शेळके यांनी आभार मानले.
कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय)
सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल