ताज्या घडामोडी

पिंपरी पेंढार येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न : चाळीस वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा

पिंपरी पेंढार -( दि 22) प्रतिनिधी
पिंपरी पेंढार येथील श्री सद्गुरू सीताराम महाराज विद्यालयातील सन १९८३-८४ बॅच चे माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळा विद्यालयातील ज्या वर्गात शिकले त्याच वर्गात पुन्हा एकदा ४० वर्षांनंतर वर्ग भरविला.

यावेळी वर्गाबाहेर विद्यार्थिनींनी सुंदर रांगोळी रेखाटली. सर्व गुरुजनांना व विद्यार्थ्यांना फेटे बांधून सर्वांचे स्वागत करण्यात आले. वर्ग भरल्यानंतर शिक्षकांचे वर्गात आगमन झाल्यावर गुरुजनांवर फुलांचा वर्षांव करून गुरुजनांचे अनोखे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ आहेर सरांची निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतुळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करणयात आली.
यावेळी सरदार नवले, बाजीराव चौगुले सर, एकनाथ आहेर , बळवंत ठुबे , गणपत शिंदे आणि विश्वनाथ आहेर या गुरुजनांना शाल, गुलाब पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या १९८३-८४ बॅचच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी पेंढार सोशल युथ फाऊंडेशन चा सत्कार शाल,गुलाब पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत वक्त केले तेव्हा गुरुजनांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी क्रीडा शिक्षक सरदार पांडुरंग नवले सर आपल्या मनोगतात म्हणाले तुमच्या बॅचने कबड्डीमध्ये शाळेचे नाव कमावले म्हणून तुमच्यामुळे माझा सन्मान वाढला. असे विद्यार्थी घडवू शकलो याचा अभिमान आहे.
चित्रकला शिक्षक एकनाथ आहेर सर मनोगत वक्त करताना स्वर्गीय जे बी मोमीन सरांच्या आठवणीने गहिवरले.
अध्यक्षस्थानी असलेले विश्वनाथ आहेर सरांनी ते या शाळेत असतानाचे अनेक किस्से सांगितले. त्याचबरोबर या प्रगतशील गावाबरोबर विशेष नाळ जोडली गेली असल्यामुळेच आम्ही या गावात आमच्या घरातील चार मुली दिल्या असल्याचे आवर्जून सांगितले. हल्लीचे घाणेरडे राजकारण यावरही भाष्य केले. हल्लीच्या राजकारणात चांगल्या वेक्तींनी यावे व बदल घडवावा असेही मत त्यांनी वक्त केले.
या स्नेहमेळाव्यात शिक्षक व विदयार्थ्यांनी ४० वर्षापूर्वीच्या काळातील अनेक किस्से सांगितले तेव्हा वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमानंतर सर्वानी मासवडी व भाकरी या स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी विद्यार्थी नंदकिशोर कुटे यांनी केले तर आभार उद्योजक सतीश नवले यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या बॅचचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!