ताज्या घडामोडी

सावित्रीबाई फुले यांचे चरित्र समाजासाठी दिशादर्शक:- स्नेहलताई शेळके : समर्थ संकुलात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

बेल्हे ( प्रतिनिधी)समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,प्रा.शिवाजी कुमकर,डॉ.शरद पारखे, रा से यो अधिकारी प्रा.दिनेश जाधव,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनाची मूल्ये आचरणात आणावी असे यावेळी प्रा.राजीव सावंत म्हणाले.
वल्लभ शेळके म्हणाले की,शिक्षणाविषयी अपार प्रेम,एक थोर समाजसुधारक,ज्योतिबांच्या सहचारिणी,एक उत्तम गृहिणी,कवयित्री,लेखिका,वक्तृत्व व भाषण कला अशा प्रकारचे सर्वगुणसंपन्न आणि अष्टपैलू महिला व्यक्तिमत्व म्हणून सावित्रीबाईंकडे पाहिले जाते.ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला.पुढे मात्र सावित्रीबाईना,ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.त्या काळात महिलेला चूल आणि मूल,उंबरठा हीच लक्ष्मण रेषा किंवा मर्यादा अशी परिस्थिती होती.मुलगी जर शिकली नाही तर प्रगती होणार नाही व काळाची पावले ओळखून स्त्री सक्षम व सबळ होण्यासाठी पुण्यात सर्वप्रथम १४ जानेवारी १९४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली.
सावित्रीबाई फुले यांचे चरित्र समाजासाठी दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके यांनी व्यक्त केले.आज पुणे विद्यापीठाने देखील सावित्रीबाईंचे कर्तृत्व आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव करत विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश बोरचटे यांनी मानले.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!