विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन समारंभ काळवाडी गावात उत्साहामध्ये संपन्न

पिंपळवंडी (प्रतिनिधी)ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव. राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन.कार्यक्रमाचे उद्घाटक ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांनी मनोगत व्यक्त करताना आजच्या काळातील युवकांना अनमोल संदेश दिला नोकरी न करता विविध व्यवसायाकडे वळा सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करून जमीन व्यवस्थापन व मृदा संवर्धन यावरती मार्गदर्शन केले. आजच्या काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय चालवले जातात त्यातून ग्रामीण व आर्थिक विकास साध्य होतो. माननीय प्रकाश मामा पाटे विश्वस्त ग्रामोन्नती मंडळ यांनी उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. काळवाडी गावचे सरपंच श्री तुषार वामन यांनी सर्वांचे स्वागत करून गावामध्ये असलेल्या कामकाजाबद्दल रूपरेषा सांगून शुभेच्छा व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद कुलकर्णी यांनी काळवाडी या गावाची प्रगती ही इतर गावांना आदर्शवत आहे असे मत प्रदर्शन केले.कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद भुजबळ यांनी नवीन वर्षाबद्दल शुभेच्छा व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुभाष कुडेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री पंचायत राज मा.श्री सुनील वामन,
तंटामुक्ती अध्यक्ष श्री.बाळासाहेब बेल्हेकर,ग्रामसेवक श्री.रवींद्र जाधव कार्यालय अधीक्षक श्री.एस.ए कुलकर्णी,राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख दिलीप शिवणे,वाणिज्य विद्याशाखा समन्वयक डॉ. एस.डी टाकळकर सर कला शाखा समन्वयक शरद काफले,हिंदी विभाग प्रमुख अनिल काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अक्षय वाजगे,प्रा. प्रतिभा मोहिते,प्रा.सविता खरात प्रा. मयुरी डगळे,प्रा. अपेक्षा शिंदे, प्रा. प्रतिमा जाधव, प्रा. सुयश पोखरकर,प्रा.अक्षय भोर यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ.विनायक कुटे यांनी केले तर आभार डॉ. वैशाली मोढवे यांनी मानले.



