वडगाव आनंद येथील उच्चशिक्षित दाम्पत्याने माळरानावर फुलविली गुलाबाची शेती

पिंपळवंडी -( प्रतिनिधी ) वडगाव आनंद येथील सत्यवान गागरे व सविता गागरे या दाम्पत्याने उजाड माळरानावर मोठया मेहनतीने गुलाब शेती
फुलवून उजाड माळरानाचे नंदनवन फुलविले आहे
नगर कल्याण महामार्गाच्या उत्तरेला गागरेमळा असून या ठिकाणाहून पिंपळगाव जोगा कालवा गेला आहे या कालव्यामुळे कालव्याच्या दक्षिनेच्या बाजूला असलेल्या शेतीला या कालव्याच फायदा झाला मात्र उत्तरेला असलेला भाग हा दुष्काळीच राहिला त्यामुळे सत्यवान गगारे यांनी प्रथम पन्नास लाख लिटर शेततळे तयार करून गुलाब शेती करण्याचा निर्णय घेतला
सध्या प्लास्टिकच्या फुलांना मागणी असली तरी कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा पुजेसाठी आपण नेहमी गुलाबाच्या फुलांचा वापर करत असतो. लग्न कार्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी गुलाबाच्या फुलांचा आपण नेहमी वापर करत असतो. गुलाब हे व्यापारी पिकातील फुल म्हणून ओळखले जाते. गुलाबाच्या शेतीतून मोठं आर्थिक गणित शेतकऱ्यांना मांडता येतं. पण त्यासाठी योग्य नियोजनाची गरज लागते व असेच अश्या प्रकारे वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील satyawa
सविता सत्यवान गागरे यांचे शिक्षण डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पर्यंत असताना केवळ शेतीची आवड असल्याने त्यांनी नोकरीच्या मागे न लागता गुलाबाचे पिक घेतले असुन व हे पिक जवळपास ७ ते ९ वर्षे चालत असल्याने या मधुन त्यांना चांगला प्रकारे रोजगार मिळाला असुन पैसा देखील चांगला मिळत आहे.
गागरे यांना शेती करत असताना ती तोट्यातच जात होती कोणते पिक घेतल्याने आपल्याला चांगले पैसे मिळतील यावर अभ्यास करून त्यांनी गुलाबाच्या फुलांची लागवड करण्याचे ठरविले .यासाठी सुरवातीला परीसरात असलेल्या ज्या ज्या ठिकाणी गुलाबांच्या बागा आहेत त्या ठिकाणी शेतावर जाऊन माहिती घेऊन लागवड करण्याचे ठरविले.यासाठी ३३ गुंठे क्षेत्राची निवड करत या शेतात ५ ट्राॅली शेणखत पांगवुन ते तापत ठेवले व एक महिन्यानंतर सहा फुटाचे अंतर ठेवुन बेड पाडले व यामध्ये अडीच फुटांचे अंतर ठेवुन शिर्डी गुलाब या जातीच्या फुलांची सुमारे २५०० रोपे आणुन लावली व या संपुर्ण बागेला ठिबक सिंचन ची व्यवस्था केल्याने वेळोवेळी औषधे व मर्यादीत पाणी दिल्याने माळरानावर गुलाबाची बाग चांगली फुलली आहे व त्यांना यासाठी एक ते दिड लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे.
सध्या या रोपांना चांगली फुले आली असुन दिवसाआड फुले तोडुन आता पर्यंत दोन ते अडीच हजार किलो फुले निघुन ती विकली आहेत . झालेला खर्च जाऊन त्यांना पंचेचाळीस ते पन्नास हजार रूपयांचा नफा झालेला आहे. यापुढे पुढील सात ते नऊ वर्षे पुर्ण पिक नफ्यात असुन माल पण जास्त निघणार आहे. सध्या शिर्डी गुलाब या जातीच्या फुलांना किलोला २०० रुपये किलोप्रमाणे बाजारभाव चालु असुन ज्या दिवशी सन,लग्ण ,यात्रा आहेत त्यादिवशी २५० रुपये किलो प्रमाणे बाजारभाव मिळत आहे.



