ताज्या घडामोडी

दिपज्योत फाउंडेशनच्या वतीने वारक-यांना औषधे वाटप

पिंपळवंडी -( दि ६) प्रतिनिधी

संत सावळेराम बाबा पिंपळवंडीकर आळंदी पायी वारी दिंडी सोहळ्यास दीपज्योत मेडिकल फाउंडेशनच्या वतीने पायी प्रवासादरम्यान लागणारी औषधे व औषधोपचार साहित्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक सोनवणे यांच्या हस्ते दिंडी सोहळा आयोजन समितीकडे सुपूर्द करण्यात आले

पिंपळवंडी ते आळंदी कार्तिकी वारीच्या निमित्ताने गेली पंचवीस वर्षे श्रीसंत सावळेराम बाबा पिंपळवंडीकर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.पिंपळवंडी काळवाडी पंचक्रोशीतील तसेच गुंजाळवाडी येथील जवळपास दोनशे वारकरी या सोहळ्यात सहभागी होत असतात.यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी नामवंत किर्तनकारांची किर्तनसेवा असणार असून काल्याच्या दिवशी संतुलित जीवनशैली, आहार विहार व ह्रदयरोग या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन दिपज्योत मेडीकल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आल्याची माहिती श्री.सोनवणे यांनी दिली.

या प्रसंगी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व गटनेते शरदराव लेंडे, तालुका उपाध्यक्ष अशोक सोनवणे ,शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश काकडे,भाजपा महिला उपाध्यक्ष संगिताताई वाघ  तानाजी काकडे,सुखदेव लेंडे, प्रेमकुमार वामन, सिताराम अभंग, अजित वाघ, रमेश वाघुले, काशिनाथ फुलसुंदर,सतिश काकडे,बबन कोकाटे, अनिल शेलार, गणेश काशिद यांच्या सह वारकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!