ताज्या घडामोडी

ॲड तुषार पाचपुते यांचा राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मान

 

पुणे  -( दि १५) प्रतिनिधी

वडगाव कांदळी ( ता जुन्नर) गावचे सुपुत्र व जिल्हा सत्र न्यायालयातील नामवंत वकील ॲड तुषार पाचपुते यांचा पुण्याच्या काव्यमित्र संस्थेच्या वतीने राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला

ॲड तुषार पाचपुते हे गेल्या काही वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालयात वकील म्हणून काम करत आहेत त्यांनी या क्षेत्रामधुन अनेक गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत तसेच ॲड तुषारदादा युवा मंचच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम राबवून सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला आहे त्यांनी अनेकांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज व परिवर्तनवादी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुण्याच्या काव्यमित्र या संस्थेच्या वतीने त्यांना खारावडे येथील म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ मधुरा मुकुंद भेलके यांच्या अध्यक्षतेखाली व पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसीलदारअर्चना निकम आंबिका ग्रुपचे अध्यक्ष पंढरीनाथ हजारे राज्याच्या ग्रुहविभागाचे  न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा सहसंचालक महेंद्र जावळे हाॅटेल राजमुद्राचे संचालक जगन्नाथ कनामे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला

काव्यमित्र या संस्थेच्यावतीने गेल्या तेवीस वर्षांपासून सामाजिक राजकीय शैक्षणिक साहित्य क्रिडा पत्रकारिता कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी केलेल्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी  पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असून संस्थेच्या या कार्यक्रमाबरोबर राज्यातील नामवंत व नवोदित कवींच्या काव्यसंम्मेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे काव्यमित्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी सांगितले

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड तुषारदादा युवा मंचचे अध्यक्ष ह.भ.प.चक्रधरमहाराज पाचपुते उपाध्यक्ष ऋषीकेश पाचपुते ह.भ.प.निलेशमहाराज कोरडे सचिव विजय चाळक सहसचिव सुमित अवारे खजिनदार ॲड सौरभ खांडगे सहखजिनदार आनंद पाचपुते कार्याध्यक्ष तेजस निलख धनंजय अडसरे सदस्य ह.भ.प.सुरेखाताई शिंदे सौ .रेश्मा पाचपुते सौ सायली पाचपुते सौ मनीषा साठे ह.भ.प.सुरजमहाराज पाचपुते ॲड मोनालिसा पटाडे मैत्रेय पाचपुते संस्थेचे सर्व पदाधिकारी व वडगाव कांदळी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Share

मुख्य संपादक - श्री विजय चाळक

कायदेविषयक सल्लागार - अँड.अद्वैत चव्हाण ( नागपूर उच्च न्यायालय) अँड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) अँड.जयवंत सोनवणे ( मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय पुणे ) अँड.सुजाता गाडेकर ( जुन्नर न्यायालय) ॲड.सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) सुचना - बातम्या काॅपीपेष्ट केल्यास काॅपीपेष्ट कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!